आमचे विकास कामे आणि कार्यक्रम
गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रम
आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज स्वच्छताभ अभियान
ग्रामपंचायत पिंपळगाव घाट येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत स्वच्छताभ अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून गाव स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
केंद्रीय पाहणी पथकाची पिंपळगाव घाट भेट
ग्रामपंचायत पिंपळगाव घाट, तालुका बीड येथे केंद्रीय पाहणी पथकाने भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. या भेटीत गावातील योजनांची अंमलबजावणी आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
पंधरा वित्त आयोगातून शौचालय बांधकाम
पंधरा वित्त आयोग २०२४ अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळगाव घाट येथे शौचालय बांधकामाचे काम करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे.
दलित वस्तीमध्ये बोरवेल सुविधा उपलब्ध
१५ वा वित्त आयोग अंतर्गत दलित वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल उभारण्यात येत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाण्याची सुविधा मिळणार आहे.
वडारवस्ती येथे पाणी पाईपलाईन काम
१५ वा वित्त आयोग अंतर्गत वडारवस्ती येथे पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना पाण्याची सोय अधिक सुलभ होणार आहे.
कार्यक्रम श्रेण्या
आमच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामील होऊन गावाच्या विकासात योगदान द्या
शिक्षण कार्यक्रम
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित शैक्षणिक कार्यक्रम आणि स्पर्धा
- • गुणवंत विद्यार्थी सत्कार
- • शैक्षणिक शिबिरे
- • स्पर्धा आणि परीक्षा
आरोग्य कार्यक्रम
गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आयोजित विविध आरोग्य सेवा आणि शिबिरे
- • विनामूल्य आरोग्य शिबिर
- • रक्तदान शिबिर
- • आरोग्य जागृती कार्यक्रम
स्वच्छता कार्यक्रम
गावाच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित विविध उपक्रम
- • स्वच्छ भारत अभियान
- • कचरा व्यवस्थापन
- • पर्यावरण जागृती
कार्यक्रमांचा प्रभाव
आमच्या कार्यक्रमांनी गावातील नागरिकांच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम झाला आहे
सामाजिक एकता
गावातील विविध घटकांमध्ये एकता आणि सहकार्य वाढवले
शैक्षणिक प्रगती
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा
आरोग्य सुधारणा
नागरिकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा आणि जागृती
पर्यावरण जागरूकता
स्वच्छ आणि हरित गावासाठी नागरिकांची जागरूकता वाढवली