आमच्याबद्दल

शाश्वत विकासाच्या दिशेने, गावातील प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून

2000+
नागरिक
50+
वर्षांचा इतिहास
100%
डिजिटल सेवांचे
24/7
सेवा उपलब्ध
प्रस्तावना

सविनय नमस्कार,

पिंपळगाव घाट हे गाव बीड तालुक्यातील दक्षिण टोकावरील शेवटचे गाव आहे. या ठिकाणी रोकड्याआई या देवीचे प्रसिद्ध असे मंदिर असून दरवर्षी कोजागिरी गुरूपौर्णिमेस याठिकाणी मोठी यात्रा भरते.

याठिकाणी गोसावी समाजाचा एक सार्वजनिक मठ असून याठिकाणीही विधिवत पूजा-अर्चना होते. गावाची एकूण लोकसंख्या १०९७ असून मतदार संख्या देखील १०९७ इतकी आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी: पिंपळगाव घाट हे गाव पूर्वी निजाम राजवटीत होते. परंतु अहमदनगर (सध्याचे अहिल्यानगर) जिल्ह्यातील इंग्रजी सत्तेविरुद्ध पिंपळगावकरांची एक महत्त्वाची भूमिका आहे.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री आण्णासाहेब एकनाथ तेलप यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणावरून इंग्रजांना सळो की पळो करून ठेवणारे स्वातंत्र्य सैनिक या गावात होऊन गेले. गावाचा हा गौरवशाली इतिहास आजही ग्रामस्थांना प्रेरणा देतो.

सामाजिक सौहार्द: पिंपळगाव घाट याठिकाणी सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात व सर्व धर्माचे सण, इतर कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरे करतात.

रोकड्याआई देवीची यात्रा आणि गोसावी समाजाचा मठ यामुळे गावाची धार्मिक व सांस्कृतिक ओळख अधिक दृढ झाली आहे. ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

मंदिर

मंदिर

शाळा

शाळा

ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत कार्यालय

आमचे ध्येय आणि ध्येयवाद

दृष्टी

Vision

ला एक आदर्श ग्राम म्हणून विकसित करणे जिथे प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावले जाईल, शैक्षणिक, आरोग्य आणि आर्थिक विकास साधला जाईल आणि गावाची परंपरा आणि संस्कृती जपली जाईल.

उद्देश

Mission

पारदर्शक आणि नागरिक केंद्रित प्रशासन राबवणे, डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या जीवनात सुलभता आणणे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणे.

आमचे मूल्ये

आमच्या कार्याचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक तत्त्वे

पारदर्शकता

सर्व निर्णय आणि कार्यवाही पारदर्शक आणि जबाबदार

नागरिक केंद्रित

नागरिकांच्या गरजा आणि हितसंबंध प्रथम

नावीन्य

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नावीन्यपूर्ण उपाय

सेवाभाव

नागरिक सेवेसाठी समर्पित आणि कटिबद्ध

आमची कामगिरी

गेल्या वर्षात आम्ही साध्य केलेले महत्त्वाचे उद्दिष्टे आणि उपलब्धी

100% डिजिटल सेवांचे

सर्व नागरिकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या

95% शिक्षण दर

गावातील मुलांची शिक्षणाची गुणवत्ता सुधारली

स्वच्छ गाव पुरस्कार

राज्यस्तरीय स्वच्छता स्पर्धेत प्रथम क्रमांक

ग्रामपंचायत संपर्क

पिंपळगाव घाट ग्रामपंचायत

ग्रामस्थांनो, तुमच्या सूचना, समस्या आणि विकासासाठीच्या कल्पना आमच्यापर्यंत पोहोचवा. आपला सहभाग गावाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे.

पत्ता

पिंपळगाव घाट, ता. बीड, जि. बीड, महाराष्ट्र - 431126

दूरध्वनी

+91 9637985300

ईमेल

gppimpalgaonghat@gmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शनिवार : सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00

आमचे स्थान

पिंपळगाव घाट, ता. बीड

संदेश पाठवा

आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या